येत्या आठवडय़ात होऊ घातलेल्या बहुराज्यीय मतदानापूर्वी अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना दोन गव्हर्नर्सनी पाठिंबा दिल्यामुळे त्यांना मोठे पाठबळ मिळाले आहे. यापैकी न्यू जर्सीचे गव्हर्नर ख्रिस ख्रिस्ती हे तर काही काळापूर्वीपर्यंत स्वत: ट्रम्प यांचे स्पर्धक होते.
ख्रिस्ती यांच्या पाठोपाठ मेन प्रांताचे गव्हर्नर पॉल लीपेज यांनीही ट्रम्प यांना पाठिंबा जाहीर केला. यंदा अमेरिकी लोकांची गव्हर्नरला पसंती दिसत नसल्यामुळे मी ट्रम्प यांच्यासोबत आहे, असे ते म्हणाले.
ट्रम्प यांना अध्यक्षपदासाठी पाठिंबा देताना मला अभिमान वाटतो, असे शुक्रवारी टेक्सासमधील फोर्टवर्थ येथे एका सभेत बोलताना ५३ वर्षांचे ख्रिस ख्रिस्ती म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा