High court Lawyers Death : उत्तर प्रदेशमधील लखनऊ शहरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. लखनऊ येथे घडलेल्या दुर्घटनेत कारवरील ताबा सुटल्याने दोन उच्च न्यायालयाच्या वकिलांचा बुडून मृत्यू झाला आहे. याबद्दल स्थानिक पोलिसांनी शनिवारी माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वकील कुलदीप कुमार अवस्थी (४०) आणि शशांक सिंग (३७) अशी मृत वकिलांची नावे आहेत, तर हे दोघे अनुक्रमे उच्च न्यायालयाचे स्टँडिंग काउंसील आणि ब्रीफ होल्डर होते. स्टँडिंग काउंसील हे उच्च न्यायालयातील खटल्यांमध्ये सरकारची बाजू मांडतात, तर ब्रीफ होल्डर हे एखाद्या खटल्याशी संबंधित कायदेशीर कागदपत्रे तयार करण्यात मदत करतात.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री हा अपघात घडला, ज्यामध्ये गाडी क्रमांक यूपी ३२ एनई १११० चालवणाऱ्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती गाडी लखनऊमधील चिन्हात पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका तळ्यात बुडाली.

शनिवारी सकाळी स्थानिक लोकांनी प्रशासनाला कळवले त्यानंतर पोलीस आणि अग्निशामक दलाला घटनास्थळी बोलवण्यात आले. यानंतर बचावकार्याला सुरूवात करण्यात आली. ही बुडालेली कार तळ्यातून बाहेर काढण्यात आली. या कारमधून दोन्ही वकीलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी दोन्ही मृतदेह पाठवले असून या घटेचा तपास केला जात आहे.