आसामच्या गुवाहाटी येथील फॅन्सी बाजार परिसरात शनिवारी दुपारच्या सुमारास दोन स्फोट झाले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास साधारण तीन मिनिटांच्या अंतराने हे स्फोट झाले. या स्फोटात आत्तापर्यंत दोन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. फॅन्सी बाजार हे गुवाहाटीमधील व्यापाराचे केंद्र म्हणून ओळखले जाते. त्यामुळे हा भाग नेहमीच गर्दीने गजबजलेला असतो. या परिसरात रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका बॅगमध्ये स्फोटक पदार्थ ठेवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या पोलीस या स्फोटांची चौकशी करत असून उल्फा या संघटनेवर त्यांचा प्राथमिक संशय आहे.
सविस्तर वृत्त थोड्याचवेळात….