शिकागोमध्ये एका भारतीय नाईटक्लबमध्ये झालेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला असून चौघे जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री २ वाजता शिकागोमधील गॅरी येथे गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन व्यक्ती जखमी झाले होते. त्यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं असता मृत घोषित करण्यात आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांच्या माहितीनुसार, एका ३४ वर्षीय व्यक्तीवर नाईटक्लबच्या गेटवर आणि २६ वर्षीय तरुणीला क्लबच्या आतमध्ये गोळीबार करण्यात आला. दोघांनाही स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. चौघे जखमी झाले असून यामधील एकाची स्थिती गंभीर आहे.

प्रशासनाने अद्याप पीडितांची कोणतीही माहिती दिलेली नाही. तसंच गोळीबाराचं नेमकं कारण काय याबद्दलही सांगण्यात आलेलं नाही. या ठिकाणी जास्त गर्दी असल्याने ती कमी करण्यासाठी अनेक यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या होत्या. सध्या याप्रकरणी तपास सुरु आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 killed 4 wounded in shooting at indiana nightclub in chicago sgy
Show comments