पाकिस्तानकडून आज पुन्हा जम्मू-काश्मीरमधील तंगहार सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. यात दोन जवान शहीद तर दोन पोलीस देखील जखमी झाले आहेत. सीमेवरील गोळीबारात सांबा सेक्टरमध्ये एका महिलेचा देखिल मृत्यू झाला आहे.
काल रात्री पाकिस्तानने काश्मीरमधील कठुआ आणि सांबा या दोन जिह्यांमध्ये गोळीबार केला. त्यांनी त्या परिसरातील गावांसह १३ चौक्यांना लक्ष्य केले होते. पाककडून झालेल्या या गोळीबारात ८ स्थानिक जखमी झाले आहेत. यामुळे भयभीत झालेल्या सीमेवरील काही भागांतील शेकडो नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. कथुआ जिल्ह्यात सुमारे १४०० जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली. या हल्ल्यांत सीमेवरील अनेक घरांचेही नुकसान झाले आहे.

Story img Loader