देशातील सॉफ्टवेअर निर्यात क्षेत्रातील बलाढ्य कंपनी ‘विप्रो’च्या एकत्रित नफ्यात डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत १.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीकडून सोमवारी ऑक्टोबर-डिसेंबर २०१५ या तिसऱ्या तिमाहीतील निकाल जाहीर करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच ‘इन्फोसिस’चे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले होते. इन्फोसिसप्रमाणेच विप्रोनेही तिसऱ्या तिमाहीत विश्लेषकांच्या अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे.
डिसेंबरमध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत विप्रोचा एकत्रित नफा २२३४.१ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा २१९२.८ कोटी इतका होता. गेल्या तिमाहीमध्ये कंपनीने ३९ नवे ग्राहक मिळवले. या तिमाहीमध्ये कंपनीने १२,९५१.६ कोटींचा महसूल मिळवला. गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत हा आकडा १२,०८५.१ इतका होता. कंपनीच्या माहिती-तंत्रज्ञान सेवा क्षेत्रातील महसूलामध्ये वर्षाला ९ टक्क्याने वाढ होते आहे.

Story img Loader