जम्मूतील राजौरीतील जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याकरता भारतीय लष्कराने मोहिम हाती घेतली असून जम्मूमध्ये रोज चकमकी घडत आहेत. काल झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे ५ जवान शहीद झाले आहेत. तर, आज सकाळी जम्मू पोलिसांनी पुन्हा ऑपरेशन सुरू केलं. राजौरी आणि बारामुल्ला जिल्ह्यात आज झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास यश मिळालं आहे.
२१ एप्रिल रोजी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड हल्ला करून दहशतवाद्यांनी धूम ठोकली होती. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते. याप्रकरणातील दहशतवाद्यांना शोधण्याकरता जम्मू पोलीस आणि भारतीय लष्कर संयुक्तिकरित्या कारवाई करत आहे. राजौरी येथे हे दहशवादी एका गुहेत लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी सापळा रचून दहशतवाद्यांविरोधात चकमक सुरू केली. परंतु, गोळीबाराच्या प्रत्युत्तरादाखल दहशतवाद्यांनीही हल्ला केला. काल, पुन्हा दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड हल्ला केला. यामुळे कालही पाच जवान शहीद झाले. तर, स्पेशल फोर्समधील एक अधिकारी जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा >> “समलैंगिकता म्हणजे विकृती, कायद्याला मान्यता मिळाल्यास….”, आरएसएस संलग्न संघटनेचे सर्वेक्षण, तज्ज्ञांचं नेमकं म्हणणं काय?
राजौरीच्या जंगलातील गुहेत हे दहशतावादी लपले असल्याचं सांगण्यात येतंय. यामुळे या दहशतवाद्यांविरोधात पोलिसांनी मोहिम उघडली आहे. ऑपरेशन त्रिनेत्रा अंतर्गत राजौरीच्या जंगलात मोठ्याप्रमाणात तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यावेळी पोलिसांनी एके५६, एक ५६ च्या राऊड्स, 1x9mm पिस्तुल, तीन ग्रेनेड घटनास्थळावरून जप्त केले आहेत. ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख पटवली जात आहे. तो लष्कर ए तोयबाशी संबंधित असल्याची शक्यता आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अशांत असलेल्या या भागात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही भेट दिली आहे. तर, निलम सिंग, अरविंद कुमार, रुचीन रावत, सिद्धांत छेत्री, प्रमोद नेगी अशी काल शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत.