मिग विमानांच्या जागी स्वदेशी बनावटीची तेजस ही वजनाने हलकी लढाऊ विमाने वापरात आणली जातील, असे सरकारने लोकसभेत सांगितले. संरक्षण, संशोधन व विकास संस्था तेजस या वजनाने हलक्या लढाऊ विमानांच्या उत्पादनासाठी काम करीत असून त्यांची निर्मिती प्रगतिपथावर आहे.
शून्य प्रहरात संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितले की, २० ते ३० तेजस विमाने हवाई दलाच्या ताफ्यात सामील केली जातील. तेजस विमाने मिग या लढाऊ विमानांची जागा घेतील. १२६ राफेल विमानांच्या खरेदीसाठी वाटाघाटी सुरू असून भारत व फ्रान्स यांनी त्यातील किमतीचा वाद सोडवण्याचे ठरवले आहे. फ्रान्सच्या डसॉल्ट कंपनीने १५ अब्ज डॉलरला ही विमाने देण्याचे मान्य केले आहे.  मिग २१ विमाने टप्प्याटप्प्याने काढून टाकून त्याजागी रशियाची मिग २९ विमाने खरेदी करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी एका प्रश्नावर सांगितले.
आता पाचव्या पिढीचे स्टिल्थ तंत्रज्ञान आले असून त्याचा समावेश असलेली विमाने रडारलाही दिसत नाहीत, पण त्या प्रकारची विमाने रशियाकडून खरेदी करण्याबाबत अजून करार झालेला नाही. दोन्ही सरकारमध्ये त्या विमानांचा विकास व रचना कशी असावी याबाबत करार झाला आहे, असे पर्रिकर यांनी सांगितले.
भारत-पाकिस्तान सुरळीत व्यापार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा