जम्मू आणि काश्मीरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांविरोधात सुरू असलेल्या अतिरेकी कारवायांच्या पाश्र्वभूमीवर बारामुल्ला जिल्ह्यातील सुमारे २० पंच आणि सरपंचांनी रविवारी आपल्या पदाचे राजीनामे दिल़े  जिवाच्या भीतीने आपण राजीनामे देत असल्याचे त्यांनी म्हटले आह़े
प्रसारमाध्यमांसमोर आपल्या राजीनाम्यांची घोषणा करणाऱ्यांमध्ये जिल्ह्यातील हर्दशिवा ए आणि बी, सोपोरे या भागातील पंचायत सदस्यांचा समावेश आह़े  ‘आम्हाला आमच्या जिवाची भीती आहे आणि म्हणून आम्ही राजीनामे देत आहोत’ असे येथील सरपंच मनझुर अहमद यांनी या वेळी सांगितल़े  सोपोरे भागातील पंचायत सदस्यांवर नव्याने झालेल्या हल्ल्यांमुळे सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे, असे सांगत सदस्यांच्या संरक्षणासाठी शासनाकडून कोणतीही पावले उचलण्यात येत नसल्याचा आरोप केला़
शुक्रवारी अतिरेक्यांनी सोपोरेमधील गोरीपोरा गावचे सरपंच हबीदुल्ला मीर यांची गोळ्या झाडून हत्या केली होती़, तर शनिवारी रात्री हर्दशिवा येथील झोना बेगम या पंचायत सदस्येवरही गोळ्या झाडून, तिला जखमी करण्यात आले होत़े

Story img Loader