पीटीआय, तिरुचिरापल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी तमिळनाडू येथे अनेक प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले आणि काही नवीन प्रकल्पांची पायाभरणी केली. या प्रकल्पांची एकूण किंमत २० हजार १४० कोटी रुपये आहे. पंतप्रधानांनी तमिळनाडूच्या सांस्कृतिक प्रेरणेची प्रशंसा केली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी सामाजिक न्यायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तमिळनाडूतील द्रविडी प्रारुपाचे समर्थन केले.
पंतप्रधान मोदींनी चेन्नईपासून सुमारे ३०० किलोमीटरवरील मध्य तमिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यात हवाई मार्ग आणि बंदरे, रेल्वे, महामार्ग, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, अणुऊर्जा आणि उच्च शिक्षणाशी संबंधित २० प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन करून ते राष्ट्राला समर्पित केले. पूर्वी तमिळनाडूत सार्वजनिक कार्यक्रमांत बहुतांश प्रसंगी मोदी इंग्रजीत बोलायचे, मंगळवारी मात्र त्यांनी हिंदीला प्राधान्य दिले. ते भारतीदासन विद्यापीठाच्या ३८ व्या दीक्षांत समारंभालाही उपस्थित राहिले.
हेही वाचा >>>‘हिट अँड रन’ कायद्याबाबत केंद्र सरकारचं स्पष्टीकरण, ट्रक चालकांना कामावर येण्याचं आवाहन
मोदी म्हणाले, की भारताला तमिळनाडूच्या जिवंत संस्कृती आणि परंपरेचा अभिमान आहे. या प्रकल्पांमुळे तमिळनाडूची अधिक भक्कम प्रगती होईल. येथील दळणवळण सुलभ होईल आणि रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध होतील. ते म्हणाले की, तमिळनाडूकडून लाभलेल्या सांस्कृतिक प्रेरणेचा देशविकासासाठी सातत्याने विस्तार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवीन संसद भवनात ‘पवित्र सेंन्गोल’ प्रस्थापित केल्याचा उल्लेख करून मोदी म्हणाले, की तमिळ संस्कृतीने संपूर्ण देशाला दिलेल्या सुशासनाच्या प्रारुपातील एक प्रेरणा आहे. आगामी २५ वर्षांचा स्वातंत्र्याचा अमृत काळ भारताला एक विकसित राष्ट्र घडवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावेल असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी यावेळी तमिळनाडूतील अतिवृष्टी-पूर ही ‘गंभीर नैसर्गिक आपत्ती’ म्हणून घोषित करण्याची आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून राज्याला योग्य तो निधी देण्याचे आवाहन केले. ही येथील जनतेची मागणी आहे असे ते म्हणाले.
हेही वाचा >>>देशावर अवकाळीचे ढग; देशाच्या बहुतांश भागात मार्चपर्यंत पावसाचा अंदाज
पूरग्रस्तांना मदतीची ग्वाही
पंतप्रधान मोदी यांनी दक्षिण तमिळनाडूसह चेन्नईत नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी, पूर आणि जीवित आणि मालमत्ता हानीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करत असल्याचेही त्यांनी सांगितले. पीडित कुटुंबांची परिस्थिती आपण समजू शकतो. केंद्र सरकार या संकटाच्या काळात तमिळनाडूच्या लोकांच्या पाठीशी उभे आहे. राज्य सरकारला आम्ही सर्वतोपरी मदत करत आहोत असे ते म्हणाले.