राजस्थानमध्ये विधानसभेच्या २०० जागांसाठी काँग्रेसकडे ४ हजार इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे उमेदवार निवडीला वेळ लागत असल्याचे सरचिटणीस अजय माकन यांनी सांगितले.
पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या निकषांनुसार उमेदवार निवडले जात आहेत. त्यामुळे उमेदवार घोषित करण्याची नेमकी तारीख सांगणे कठीण असल्याचे माकन यांनी सांगितले. राजस्थानमध्ये काँग्रेसला सत्तेत पुन्हा येण्याची संधी असल्याचा दावा त्यांनी केला. राजस्थानमध्ये १ डिसेंबरला मतदान होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 200 seats in rajasthan legislative assembly 4000 enthusiastic to contest election
Show comments