जागतिक तापमानाच्या पाहणीनंतर ‘नासा’च्या शास्त्रज्ञांचे मत
सरलेल्या २०१२ या वर्षांत सरासरी तापमान १४.६ अंश सेल्सिअस इतके होते आणि १८८० पासून कोणत्याही वर्षांपेक्षा तापमानाच्या बाबतीत २०१२ चा नववा क्रमांक लागतो, असे ‘नासा’च्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
सन १८८० पासून आतापर्यंत १९९८ चा अपवाद वगळल्यास २०००, २००५ आणि २०१० आणि २०१२ या वर्षांमध्ये उष्णतेची पातळी सर्वाधिक होती. न्यूयॉर्कमधील ‘नासा’च्या गोडार्ड या अंतराळ अभ्यास संस्थेने जागतिक तापमानाचा आढावा घेतला आणि मंगळवारी त्याची माहिती दिली.
अनेक दशकांपूर्वीपेक्षा पृथ्वीवर उष्ण तापमान कसे कायम राहिले त्याची तुलना करण्यात आली आहे. सरलेल्या २०१२ वर्षांत सरासरी तापमान १४.६ अंश     सेल्सिअस इतके होते आणि ते २० व्या शतकाच्या मध्यात ०.६ सेल्सिअसने जास्त होते. सरासरी वैश्विक तापमान १८८० पासून ०.८ अंश सेल्सिअसने वाढले आहे, असेही अभ्यासात आढळले आहे.
हवामानाच्या पद्धतीत होणारे बदल तापमानातील सरासरी चढउताराला कारणीभूत असतात. मात्र पृथ्वीवरील हरित वायूच्या उत्सर्जनामुळे वैश्विक तापमानात दीर्घकालीन वाढ होण्यास मदत होते, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
प्रत्येक वर्षी गेल्या वर्षीपेक्षा उष्णतेचे प्रमाण जास्त असेलच असे नाही, मात्र हरित वायूच्या उत्सर्जनामुळे प्रत्येक नवे दशक हे गेल्या दशकापेक्षा अधिक उबदार असेल, असेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा