सन २०१४  हे वर्ष हवामान बदलांमुळे सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या हवामान संघटनेने सांगितले.
हवेचे सरासरी तपमान २०१४ मध्ये ०.५७ अंश सेल्सियसने जास्त होते. १९६१ ते १९९० या काळात सरासरी तपमान १४ अंश सेल्सियस होते असे जागतिक हवामान संघटनेने म्हटले होते. या शतकात १५ उष्ण वर्षांपैकी १४ वर्षांचा समावेश आहे, असे या संस्थेचे सरचिटणीस मायकेल जराँद यांनी सांगितले.
२०१४ या वर्षांत उष्णतामान विक्रमी होते, अनेक देशात पूर व दुष्काळही पाहायला मिळाले. ते हवामान बदलांचेच परिणाम होते असे सांगण्यात आले.
संयुक्त राष्ट्रांच्या सदस्यांची बैठक पुढील आठवडय़ात होत असून त्यात पॅरिस येथे होणाऱ्या हवामान करारावर विचार करण्यात येणार आहे व हरितगृह वायू कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. जागतिक तपमानवाढ ही औद्योगिकीकरण पूर्व काळातील तपमानाच्या तुलनेत २ अंश सेल्सियसच्या पेक्षा जास्त असता कामा नये, अशी मर्यादा घालण्याचा संयुक्त राष्ट्रांचा विचार असून पण पृथ्वीचे तपमान वाढतच असून त्यामुळे अनेक पेचप्रसंगांना तोंड द्यावे लागेल, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.

Story img Loader