Sabarmati Express derails: वाराणसी-अहमदाबाद दरम्यान प्रवास करणाऱ्या साबरमती एक्सप्रेसचे २२ डबे उत्तर प्रदेशमधील कानपूर आणि भीमसेन स्थानकादरम्यान रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास रूळावरून घसरले. या अपघातात कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना दिली. लोको पायलटने दिलेल्या माहितीनुसार रूळावरील वस्तूला इंजिनची धडक बसल्यामुळे सदर अपघात झाला. या अपघातानंतर रेल्वेने प्रवाशांना बसची सुविधा उपलब्ध करून देत त्यांना कानपूर येथे आणले आहे. तिथून त्यांची अहमदाबादला जाण्याची व्यवस्था केली जात आहे.

कानपूरचे उपजिल्हाधिकारी राकेश वर्मा यांनी एएनआयशी बोलताना म्हटले की, २२ डबे रूळावरून खाली घसरल्याचे दिसत आहे. या घटनेत अद्याप कुणीही जखमी झाल्याचे समोर आलेले नाही. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातामुळे या मार्गावरील सात ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर तीन ट्रेन इतर मार्गावरून वळविण्यात आल्या आहेत.

Mumbai central railway block loksatta news
मुंबई: मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
Vande Bharat Express ticket cancellation charges
Vande Bharat Ticket Cancellation Charges :वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट रद्द करताय? तिकीट रद्द करताच किती रक्कम घेतली जाते? घ्या जाणून
Western Railway service disrupted mumbaiu print news
पश्चिम रेल्वेची सेवा खोळंबली
Metro stopped, Metro Mumbai, MMRC Mumbai,
दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका

अपघात कुठे आणि कसा झाला?

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद एक्सप्रेस रात्री कानपूर स्थानकावरून निघाल्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजे २.३० वाजता भीमसेन स्थानकाच्या अलीकडे रूळावरून खाली घसरली. याच ट्रकवरून रात्री १.२० वाजण्याच्या सुमारास पाटना – इंदूर ट्रेन विनाअडथळा व्यवस्थित गेली होती.

रूळावरील खडक आणि इंजिन यांच्यात धडक झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे इंजिनच्या पुढच्या भागाचे थोडे नुकसान झाले आहे. लोको पायलटनेही इंजिनच्या पुढच्या बाजूला असलेल्या कॅटल गार्डचे अपघातामुळे नुकसान झाले असल्याचे सांगितले. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही याला दुजोरा दिला आहे.