झारखंडमधील नक्षलप्रभावित भागातून तब्बल २२ इंन्टेन्सिव्ह एक्स्प्लोझिव्ह डिव्हाइस (आयइडी) जप्त करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे नक्षलविरोधी दल ‘कोब्रा’ आणि स्थानिक पोलीस यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. लटेहार जिल्ह्यातील अमवाटीकर आणि मणिका भागामध्ये सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. याच भागामध्ये नक्षलवाद्यांनी आणखी काही स्फोटके लपवून ठेवलेली आहेत का, याचाही शोध घेण्यात येतो आहे. दरम्यान, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
झारखंडमधील नक्षलग्रस्त भागातून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त
झारखंडमधील नक्षलप्रभावित भागातून तब्बल २२ इंन्टेन्सिव्ह एक्स्प्लोझिव्ह डिव्हाइस (आयइडी) जप्त करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली.
First published on: 05-11-2013 at 01:40 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 22 ieds recovered from jharkhand