उत्तर प्रदेशमधील कासगंज जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली. येथे प्रवाशांना घेऊन जाणारे एक ट्रॅक्टर ट्रॉलीसहित थेट तलावात पडल्यामुळे तब्बल २२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महिला तसेच लहान मुलांचाही समावेश आहे. रविवारी (२४ फेब्रुवारी) हा अपघात घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या ट्रॅक्टर ट्रॉलीत एकूण ४० जण बसलेले होते. यातील अनेकजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

प्रवास गंगेत स्नान करण्यासाठी निघाले होते

पोलिसांनी सांगितल्यानुसार कासगंज जिल्ह्यातील गधाई गावाजवळ रियाजगंज-पटियाली रस्त्यावर हा अपघात घडला. ट्रॅक्टरमधून प्रवास करणारे प्रवासी हे मूळचे एटा जिल्ह्यातील जैथारा गावातील होते. हे प्रवासी गंगेत स्नान करण्यासाठी ते कादरगंजकडे जात होते.

Accident
Accident : दाट धुक्याने घात केला! १२ प्रवासी असलेली क्रूझर कार कोसळळी कालव्यात; १० जण बेपत्ता
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
western railway year 2024 vasai palghar dahanu railway line 227 passengers death
वसई, नालासोपारा रेल्वे स्थानकांतील गर्दी प्रवाशांच्या जीवावर; ट्रेन मधून पडून ५० तर रुळ ओलांडताना १२८ प्रवाशांचा मृत्यू
Flocks of devotees gathered at the Maha Kumbh mela in Prayagraj, Uttar Pradesh on January 29
Mahakumbh 2025 Stampede : ३० लोकांचा बळी कसा गेला? DIG म्हणाले, “भाविक ब्रम्ह मुहूर्ताची वाट पाहात होते, तेवढ्यात…”
Buldhana, Speeding car hits a vehicle, car ,
बुलढाणा : भरधाव कार वाहनावर आदळली, एक जागीच ठार, दोघे गंभीर…
Navi Mumbai year 2024 road accidents navi mumbai police
नवी मुंबई : रस्ते अपघातांमध्ये वर्षभरात २८७ मृत
private school bus in Umarkhed accident near Palshi Fata on Saturday killing ninth grade student
भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, चार जखमी; वाई बसस्थानकासमोर अपघात
uncontrolled trailer damaged many cars Ambernath driver arrested
Video : बेदरकार ट्रेलरने अंबरनाथमध्ये अनेक गाड्यांना उडवले, ५० हून अधिक गाड्यांचे नुकसान; पोलिस, रिक्षाचालकांनी चालकाला पकडले

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रॅक्टरचा वेग जास्त असल्यामुळे चालकाचा ट्रॅक्टरवरील तोल सुटला. ज्यामुळे अपघात झाला. “तलावात पडलेल्या प्रवाशांना बुलडोझरच्या मदतीने बाहेर काढले जात आहे. तर जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातादरम्यान ट्रॅक्टर अन्य वाहनांवरही आदळले. त्यामुळे इतर वाहनांचाही यावेळी अपघात झाला. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे,” असे किसनगंज पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची आर्थिक मदत

दरम्यान, या घटनेची दखल घेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत केली जाणार आहे.

Story img Loader