शाळकरी विद्यार्थ्यांवर हल्ले होण्याचे सत्र चीनमध्ये पुन्हा एकदा सुरू झाले आहे. येथील हेनन प्रांतात एका शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ शाळकरी विद्यार्थ्यांवर केलेल्या सुरीहल्ल्यांत २२ विद्यार्थी जखमी झाले आहेत. ३६ वर्षीय मिन यिंगजुन असे संशयिताचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी झिनयांग शहरातील चेनपेंग प्राथमिक शाळेत ही दुर्घटना घडली. गेल्या दोन वर्षांत मानसिक रुग्णांकडून अशा प्रकारचे हल्ले सातत्याने केले जात आहेत. मात्र हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे पोलिसांनी सांगितले.  

Story img Loader