22 Year Old Man Dies In Cricket Match: मध्य प्रदेशातील खरगोन येथे शनिवारी संध्याकाळी २२ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. क्रिकेटच्या सामन्यात खेळत असतानाच या तरुणाला हृदयविकाराचा झटका आला होता. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कटकूट गावात गोलंदाजी करताना इंदलसिंग जाधव बंजारा यास हृदयविकाराचा झटका आला.बंजारा याला त्वरीत रुग्णालयात नेण्यात आले, परंतु हॉस्पिटलमध्ये पोहोचताच त्याला मृत घोषित करण्यात आले, असे बडवाह सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉ. विकास तलवारे यांनी सांगितले. शवविच्छेदन तपासणीत मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका आढळून आला. तपासणीनंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आल्याचे डॉ.तलवारे यांनी नमूद केले.

बंजाराला रुग्णालयात नेणाऱ्या साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, त्याने सामन्यादरम्यान छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. पीटीआयच्या अहवालात शालिग्राम गुर्जर, या स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की, इंदलसिंग हा बरखड तांडा गाव संघाकडून खेळत होता, ज्याने प्रथम फलंदाजी करताना ७० धावा केल्या. संघ गोलंदाजी करत असताना बंजाराने छातीत दुखत असल्याचेही सांगितले, त्यानंतर त्याने काही वेळ झाडाखाली विश्रांती घेतली. संघाच्या विजयानंतर त्याने आपल्या सहकाऱ्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र हॉस्पिटलमध्ये जात असताना वाटेतच त्याचे निधन झाले.

Stunts by bikers kill young man in road accidnet
दुचाकीस्वारांच्या स्टंटबाजीने घेतला रस्त्यावरील तरुणाचा बळी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
14-year old Ira Jadhav slams 346 in U19 cricket breaks Smriti Mandhanas record against Meghalaya
Ira Jadhav : १५७ चेंडू, ३४६ धावा आणि ४२ चौकार…इरा जाधवने स्मृती मानधनाला मागे टाकत झळकावले विक्रमी त्रिशतक
iim bangalore student death
२९ वा वाढदिवस साजरा केला आणि विद्यार्थ्याचा काही तासातच झाला मृत्यू; IIM बंगळुरुमधील धक्कादायक घटना
Rajagopal Chidambaram passed away, Rajagopal Chidambaram,
प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन
Maharashtra accident 11 deaths
तीन दुर्घटनांमध्ये ११ जणांचा मृत्यू, सोलापूर, जालन्यात मोटारींचे अपघात; चंद्रपुरात दुचाकीची ट्रकला धडक
Former Kinwat Mahur MLA and NCP leader Pradeep Naik died
माजी आमदार प्रदीप नाईक यांचे निधन, दहेली तांडा येथे गुरुवारी अंत्यसंस्कार
Akkalkot collision between Scorpio and Eicher Truck four devotees died
अक्कलकोटजवळ मोटार आणि ट्रकच्या अपघातात चौघांचा मृत्यू , देवदर्शनासाठी गाणगापूरला जाताना काळाचा घाला

हे ही वाचा<< छातीत फक्त जळजळ होतेय की हार्टअटॅक आलाय? लक्षण कसे ओळखाल, फक्त डाव्या बाजूला दुखणं नव्हे तर..

दरम्यान, यापूर्वी मागील वर्षी आठवीतील एका विद्यार्थ्याचा क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना पुण्याच्या वानवडी भागात घडली होती. अवघ्या १४ वर्षाचा हा चिमुकलासकाळी मित्रांबरोबर क्रिकेट खेळायला गेला होता. क्रिकेट खेळत असताना त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याने वडिलांशी संपर्क साधला.रुग्णालयात जाण्याआधी तो बेशुद्ध पडला होता. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अशाप्रकारचा हृदयविकाराचा झटका हा कार्डियाक अरेस्टप्रमाणे अगदी तीव्र स्वरूपात येण्याचा धोका असतो. अचानक केलेला व्यायाम, धावपळ, ताण व बदलती जीवनशैली या धोक्याला कारण ठरते.

Story img Loader