आज लोकसभेत दोन तरूणांनी घुसखोरी करून गोंधळ उडविल्यानंतर आजच्याच दिवशी १३ डिसेंबर २००१ रोजी झालेल्या हल्ल्याची आठवण अनेकांना झाली. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. हल्ल्यात एकूण ९ जण ठार झाले होते. त्यात आठ सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या हल्ल्यातील पाचही दहशतवादी सुरक्षा दलांकडून मारले गेले होते. या हल्ल्यात शहीद झालेल्यांना आजच लोकसभेतील खासदारांनी श्रद्धांजली अर्पण केली होती.

२२ वर्षांपूर्वी संसदेवर झाला होता हल्ला

१३ डिसेंबर २००१ रोजी सकाळी ११.४० वाजता पाच दहशतवादी संसदेमध्ये घुसले होते. गृहमंत्र्यांचा स्टिकर लावलेल्या गाडीमध्ये हे पाचही जण संसदेच्या आवारात आले. पण सुरक्षा रक्षकांना सदर गाडीबाबत संशय आल्यानंतर गाडीला मागे जाण्यास सांगितले गेले. यामुळे दहशतवाद्यांनी गाडीतून बाहेर पडत अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. यामुळे संसदेचा आपत्कालीन अलार्म वाजविलागेला आणि संसद सभागृहात जाणारे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. त्यावेळी संसदेत शंभरहून अधिक खासदार, मंत्री उपस्थित होते.

Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Bullet Mak in parliament
जुन्या संसदेवर हल्ला झाल्यानंतर गोळीबारामुळे भिंतींना छिद्र पडले होते. (Express Photo)

हे वाचा >> Video : लोकसभेत घुसखोरी केलेल्या तरुणांना खासदारांनी दिला चोप; व्हिडिओ व्हायरल

जवळपास ३० मिनिटे गोळीबार सुरू होता. या चकमकीत पाचही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात नऊ लोक शहीद झाले. त्यामध्ये दिल्ली पोलिस दलातील पाच जणांचा समावेश होता. केंद्रीय राखीव पोलिस दलातील एक महिला, संसदेतील दोन कर्मचारी आणि एका पत्रकाराचा समावेश होता. या घटनेनंतर पोलिसांनी काही तासांतच या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अफजल गुरुला अटक केली.

तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी जाहीर केले की, सदर हल्ला पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांच्यामार्फत करण्यात आला होता. पुढील तपासातून निष्पन्न झाले की, सर्व पाच दहशतवादी हे पाकिस्तानी नागरिक होते. त्यांच्या भारतातील साथीदारांनाही कालांतराने ताब्यात घेण्यात आले. अडवाणी या घटनेबाबत माहिती देताना म्हटले की, सदर हल्ला सर्वात धक्कादायक तर आहेच, पण यामुळे दहशतवादाविरोधात आता आणखी कठोर होण्याचे संकेत मिळत आहेत. मागच्या दोन दशकांपासून पाकिस्तानकडून भारताविरोधी दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत, या घटनेने आता टोक गाठले.

martyrs of 2001 Parliament attack
दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले सुरक्षा रक्षक आणि संसदेचे कर्मचारी. (Express Photo)

हल्ल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याच दिवशी एफआयआ दाखल करून चौकशी सुरू केली. तसेच जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट या दहशतवादी संघटनेंचा सदस्य असलेल्या मोहम्मद अफजल गुरू याला अटक करण्यात आली. त्याच्यासह त्याचा भाऊ शौकत हुसैन गुरु, शौकतची पत्नी अफसान गुरु आणि दिल्ली विद्यापीठातील अरेबिक विषयाचे शिक्षक एसएआर गिलानी यांनाही अटक करण्यात आली. गुरु, गिलानी आणि शौकत यांना ९ डिसेंबर २००१ रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तर अफसान गुरूला निर्दोष सोडण्यात आले. २००३ साली गिलानीलाही निर्दोष सोडले गले. तर २००५ साली शौकतला दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. सप्टेंबर २००६ साली अफजल गुरूला फाशी देण्याचा निकाल न्यायालयाने दिला.

आणखी वाचा >> Parliament Breached : संसदेतील घुसखोरांना ‘या’ खासदारातर्फे मिळाला होता व्हिजिटर पास

पुढे ४ फेब्रुवारी २०१३ रोजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी गुरुच्या पत्नीकडून दाखल केलेला दयेचा अर्ज फेटाळून आला. त्यानंतर सहा दिवसातच अफजल गुरुला फाशीची शिक्षा देण्यात आली. अफजलचा मृतदेह तिहार कारागृहातच दफन करण्यात आला आहे.

फाशीपूर्वी चेहरा निर्विकार

फाशीच्या दिवशी सकाळी पाच वाजता अफजल गुरुला उठविण्यात आले. नमाज पठण झाल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अहवालानंतर सकाळी आठ वाजता फाशी देण्यात आली. फाशी देण्यापूर्वी अफजलच्या चेहरा निर्विकार होता, असे कारागृहातील अधिकाऱ्यांनी सांगितले होते.