इराणमध्ये महसा अमिनी या २२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. योग्य पद्धतीने हिजाब परिधान न केल्यामुळे दोन दिवसांपूर्वी तिला इराणधील ‘मोरालिटी पोलिसां’नी अटक केली होती. अटकेच्या कारवाईनंतर कोमामध्ये गेल्यामुळे या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला.

हेही वाचा >>> अझरबैजान-आर्मेनियामध्ये पुन्हा युद्ध भडकणार? १०० वर्षांपासून सुरू असलेला वाद काय आहे?

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
Mangalsutra thief arrested thane, Mangalsutra thief,
ठाणे : महिलेला ढकलून मंगळसूत्र चोरणारा अटकेत
women committed suicide pune, husband harassment,
पतीच्या छळामुळे दोन महिलांची आत्महत्या; कोंढवा, विमानतळ पोलिसांकडून गुन्हे दाखल
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
Murder of woman in Hadapsar area body was kept in bed compartment
हडपसर भागात महिलेचा खून, मृतदेह पलंगातील कप्यात ठेवल्याचे उघड
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार महिलांसाठीच्या ड्रेसकोडची अंमलबजावणी करण्यासाठी इराणमध्ये पोलिसांचे एक समर्पित दल आहे. ज्याला तेथे मोरालिटी पोलीस म्हटले जाते. याच पोलिसांनी इराणमध्ये आपल्या पालकांसोबत आलेल्या महसा अमिनी या महिलेला अटक केली होती. मात्र ताब्यात घेताच या महिलेला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर या महिलेला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र कोमामध्ये गेल्यानंतर या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. याच घटनेमुळे इराण सरकार तसेच महिलांसाठी असलेल्या ड्रेसकोडवर टीका केली जात आहे. महसा या महिलेला ड्रेसकोडबद्दलची माहिती देण्यासाठी इतर महिलांसोबत ताब्यात घेण्यात आले होते, असे येथील पोलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचा >>> Video : “मी तुम्हाला आत्ता वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकत नाही, पण…”, व्लादिमीर पुतीन यांनी मोदींना सांगितली रशियातील ‘ती’ प्रथा!

दरम्यान, मानवाधिकार कार्यकर्त्यांनी या घटनेची दखल घेत मृत महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर पोलिसांनी महिलेला जबरदस्तीने पोलीस वाहनात बसवले. यावेळी महिलेच्या भावाने पोलिसांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर उत्तरादाखल आम्ही तुझ्या बहिणीला पोलीस ठाण्यात एका तपासासाठी घेऊन जात आहोत, असे सांगण्यात आले, असे मानवाधिकार कार्यकर्त्यांनी सांगितले. तसेच मानवाधिकार संस्था अम्नेस्टी इंरनॅशनल या संस्थेनेही या घटनेची दखल घेत या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोठडीत असताना महिलेचा छळ आणि तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. याच कारणामुळे या घटनेची चौकशी होण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका घेतली आहे.