जम्मू-काश्मीरमधील लडाख प्रांतात अतिउंचीवर अडकलेल्या इंग्लंडच्या २२ आणि एका फ्रेंच गिर्यारोहकाची भारतीय हवाईदलाकडून सुटका करण्यात आली. मुसळधार पावसातही भारतीय हवाई दलातील जवानांनी शिताफीने त्यांची सुटका केली.
सेनादलाचे प्रवक्ते लष्करातील नॉर्दर्न कमांडचे कर्नल एस. डी. गोस्वामी म्हणाले की, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हवाई दलाच्या जवानांनी ६ ऑगस्ट रोजी या गिर्यारोहकांची सुटका करण्यात यश मिळविले. लडाख प्रांतातील इंडस, नुब्रा आणि श्योक या नदी पात्रांच्या प्रदेशात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे या तिन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या भागातील सर्व रस्ते बंद असून दूरध्वनी सेवाही खंडित झाली आहे.
लेह येथील हवाई दलाच्या केंद्रावर मारखा घाटात इंग्लंडच्या गिर्यारोहकांचा गट अडकल्याची आणि यामध्ये काही अस्थमा पीडित असल्याची माहिती मिळाली. हा संदेश मिळताच लेह केंद्रातील हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. गोस्वामी म्हणाले की, विंग कमांडर बी. एस. सेहरावत, के. एस. नेगी आणि व्ही. चौहान यांही दोन हेलिकॉप्टरच्या साहाय्याने शोध घेतला असता इंग्लंडच्या १० गिर्यारोहकांचा शोध लागला. त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी ११ गिर्यारोहकांना सोडविण्यात यश मिळाले. लेह येथे एक फ्रेंच महिला जखमी अवस्थेत सापडली. येथील सेनादलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर या महिलेला गंभीर जखमा झाल्याचे स्पष्ट झाले.
भारतीय हवाई दलाकडून २३ गिर्यारोहकांची सुटका
जम्मू-काश्मीरमधील लडाख प्रांतात अतिउंचीवर अडकलेल्या इंग्लंडच्या २२ आणि एका फ्रेंच गिर्यारोहकाची भारतीय हवाईदलाकडून सुटका करण्यात आली.
First published on: 09-08-2015 at 12:46 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 23 british nationals rescued in ladakh