संरक्षण साहित्य खरेदीतील घोटाळ्याप्रकरणी २०१०पासून सुरू असलेल्या चौकशीदरम्यान केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) आतापर्यंत २३ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, अशी माहिती संरक्षणमंत्री ए़ के. अ‍ॅण्टनी यांनी दिली़
यापैकी सहा गुन्ह्यांमध्ये परदेशी कंपन्यांचा समावेश आह़े  वायुदलासाठी ऑस्टावेस्टलॅण्ड आणि तात्रा ट्रककडून खरेदी करण्यात आलेले अतिविशेष महत्त्वाची हॅलिकॉप्टर आणि लष्करासाठी टेहळणीच्या दृष्टीने उपयुक्त हॅलिकॉप्टर या खरेदीत परदेशी कंपन्यांची नावे विशेषत्वाने घेतली जात आहेत़
या प्रकरणात अद्याप संरक्षण मंत्रालयाच्या कोणताही अधिकारी दोषी आढळलेला नाही, असेही अ‍ॅण्टनी यांनी सोमवारी लोकसभेला माहिती देताना सांगितल़े
अटींची पूर्तता न करणाऱ्या सुमारे १५ देशी आणि परदेशी कंपन्यांना मंत्रालयाकडून बाद ठरविण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितल़े  यांपैकी सहा कंपन्यांना १० वर्षांसाठी कोणताही व्यवसाय करण्याची बंदी घालण्यात आली आह़े  तर इतर कंपन्यांवर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आली आहे, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितल़े

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा