अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया विद्यापीठातून नितीशा कंधुला ही २३ वर्षीय भारतीय विद्यार्थिनी बेपत्ता झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सहकार्य करावं असं आता तिच्या सहकाऱ्यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २८ मेपासून ही मुलगी बेपत्ता झाली आहे. कॅलिफोर्निया स्टेट विद्यापीठात नितीशा शिकत होती, तिला लॉस एंजल्समध्ये शेवटचं पाहिलं गेलं.

पोलीस अधिकारी जॉन गोटिएरेज यांनी काय माहिती दिली?

सीएसयूएसबीचे पोलीस अधिकारी जॉन गॉटिएरेज यांनी रविवारी एक्स पोस्ट करत सांगितलं की या मुलीला लॉस एंजल्समध्ये पाहिलं गेलं होतं. ३० मे रोजी ती बेपत्ता झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. #MissingPersonAlert हा हॅशटॅगही त्यांनी सुरु केला आहे. कॅलिफोर्निया स्टेट विद्यापीठाचे सॅन बर्नार्डिनो पोलीसही यात आहेत. त्यांनी हे आवाहन केलं आहे की कुणाला नितीशा कंधुलाबाबत माहिती असेल तर ९०९ ५३७५१६५ या क्रमाकांवर आमच्याशी संपर्क साधा.

Crime against city president of Shinde group fraud of Rs 1 crore 56 lakh by lure of job
शिंदे गटाच्या शहराध्यक्षाविरुद्ध गुन्हा, नोकरीचे आमिष दाखवून…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Achole Police Station, English Lessons,
वसई : आता पोलीसही बोलणार फाडफाड इंग्रजी, पोलीस ठाण्यात भरतेय ‘इंग्रजीची शाळा’
14 year old girl pregnant loksatta news
Nagpur Crime News: १४ वर्षांची मुलगी तीन महिन्यांची गर्भवती, प्रियकराविरुद्ध गुन्हा
ajit pawar devendra fadnavis
“जमत नसेल तर स्पष्ट सांगा”, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून अजित पवारांचा पोलिसांवर संताप; गृहमंत्री फडणवीस म्हणाले…
wardha school students attendance biometric
प्रायव्हेट कोचिंग क्लासेसवर लगाम!; शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी नसल्यास…
Minister Pankaja Mundes clarification on Anjali Damanias allegations
बीडमधील अधिकारी मी नेमलेले नाहीत, आरोपांबद्दल मंत्री पंकजा मुंडे यांचे स्पष्टीकरण
man cut hair of young woman during train journey railway police arrest accused
रेल्वे प्रवासात तरुणीचे कापले केस, रेल्वे पोलिसांनी आरोपीला केली अटक

हे पण वाचा- भारतीय विद्यार्थिनीला अमेरिकेत अटक, पॅलेस्टाईन समर्थनार्थ विद्यापिठात निदर्शने केल्याने कारवाई!

पोलिसांनी त्यांच्या लेखी आवाहनात काय म्हटलंय?

नितीशाबाबत पोलिसांनी एक लेखी आवाहनही जारी केलं आहे. त्यात पोलिसांनी म्हटलं आहे, “नितीशा कंधुला ही २३ वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता आहे. तिची उंची ५ फूट ६ इंच आहे, तिचे केस आणि डोळे काळे आहेत. तिचं वजन ७२.५ किलो आहे. कॅलिफोर्नियाचं लायसन्स असलेली टोयोटा कोरोला कार ती चालवत होती. पोलिसांनी या प्रकरणी ज्यांना माहिती असेल त्यांनी संपर्क साधावा असं सांगत 909 538 7777 हा क्रमांक पोस्ट केला आहे. याआधी पोलिसांना भारतीय विद्यार्थी रुपेश चंद्र हा शिकागोतून बेपत्ता झाल्याचीही माहिती मिळाली होती.

हे पण वाचा- कॅनडामध्ये भारतीय तरुणाची हत्या? कारमध्ये आढळला मृतदेह, पोलीस म्हणाले…

एप्रिल महिन्यात आढळला भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह

याआधीच्या एका घटनेत भारतीय विद्यार्थ्याचा शोध सुरु होता. त्याचा मृतदेह पोलिसांना एप्रिल महिन्यात आढळून आला होता. या विद्यार्थ्याचं नाव मोहम्मद अब्दुल अरफात असं होतं. तो मूळचा हैदराबादचा होता आणि क्लेव्हलँड या ठिकाणी शिक्षण घेत होता. मात्र त्याचा मृतदेह आढळून आला. मार्च महिन्यात ३४ वर्षीय शास्त्रीय नर्तिक अमरनाथ घोश यांची गोळ्या झाडून हत्या झाली. तर फेब्रुवारी महिन्यात समीर कामत या २३ वर्षीय इंडो-अमेरिकन विद्यार्थ्याला ठार करण्यात आलं. या सगळ्या घटना घडत असतानाच आता आणखी एक भारतीय विद्यार्थिनी बेपत्ता झाली आहे.

नितीशा कंधुला ही मूळची हैदराबाद होती, ती कॅलिफोर्नियात शिकत होती. तिच्या बेपत्ता होण्याच्या बातमीने तिचे कुटुंबीयही त्रस्त झाले आहेत. तिच्या जवळच्या नातेवाईकांनीही तिच्याबद्दल पोस्ट करत तिचा शोध घ्यावा अशी विनंती केली आहे.

Story img Loader