एका २३ वर्षीय तरुणीनं राजस्थानचे मंत्री महेश जोशी यांचा मुलगा रोहित जोशी याच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपी राहुल जोशी यानं लग्नाचं आमिष दाखवून अनेकदा बलात्कार केल्याचा आरोपी पीडित तरुणीनं केला आहे. या प्रकरणी आरोपी रोहित याला अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांचं एक पथक आज सकाळी जयपूरला पोहोचलं होतं. या पोलीस पथकात एकूण १५ पोलीस अधिकारी होते.

पोलिसांनी मंत्री महेश जोशी यांच्या जयपूरमधील दोन घरांवर छापेमारी केली. पण दोन्ही ठिकाणी मंत्र्यांचा मुलगा रोहित जोशी आढळून आला नाही. दरम्यान, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, “आमची पथके फरार असलेल्या रोहित जोशीचा शोध घेत आहेत.” शोध घेऊनही आरोपी न आढळल्याने पोलिसांनी आरोपी रोहित जोशी याला समन्स बजावला असून १८ मे पर्यंत पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहे. याबाबतची समन्सची प्रत पोलिसांनी आरोपीच्या घराच्या भिंतीवर चिटकवली आहे.

पीडित तरुणीनं आपल्या तक्रारीत विविध प्रकारचे आरोप केले आहेत. पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार, मंत्र्याचा मुलगा रोहित जोशी यानं पीडितेवर गेल्या वर्षी ८ जानेवारी ते यावर्षी १७ एप्रिल दरम्यान अनेक वेळा बलात्कार केला. तिच्याशी लग्न करण्याचं आश्वासनही दिलं होतं. तसेच आरोपीनं अपहरण करत ब्लॅकमेल केल्याचा आरोपही पीडितेनं केला आहे. या प्रकरणी दिल्ली पोलीस ठाण्यात आरोपी रोहित जोशी याच्याविरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्यावर्षी दोघांची फेसबुकवर ओळख झाली होती. त्यानंतर दोघं एकमेकांच्या संपर्कात होते.

पहिल्यांदा भेट झाल्यानंतर आरोपीनं दारू पाजून नग्न फोटो आणि व्हिडीओ काढल्याचा आरोपही पीडितेनं केला आहे. दरम्यान काही दिवसांनी पीडित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीनं गर्भपात करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला होता. पण पीडितेनं तसं केलं नाही. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीचा शोध घेत आहेत. १८ मे पर्यंत पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर रहावं असा समन्सही पोलिसांनी बजावला आहे.

Story img Loader