वायव्य पाकिस्तानमधील पेशावर शहरात दहशतवाद्यांनी रिमोट कंट्रोलने घडविलेल्या स्फोटात २४ जण ठार झाले. सुरक्षारक्षकांना लक्ष्य करण्यासाठी हा स्फोट करण्यात आला. मृतांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. यात अनेक जण जखमी झाले असून १० वाहनांसह अनेक दुकानांचेही नुकसान झाले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहशतवाद्यांनी सुमारे ४० किलो स्फोटक यासाठी वापरल्याचे पेशावरचे पोलीस उपायुक्त जावेद मारवट यांनी सांगितले. या स्फोटासाठी आयईडीचा वापर केला असावा असा कयास आहे.

Story img Loader