भोपाळ : मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात ६०पेक्षा जास्त गायी आणि बैल मारल्याच्या संशयावरून पोलिसांनी २४ जणांना अटक केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. अटक करण्यात आलेल्यांपैकी आठ जण नागपूरमधील आहेत. धार्मिक तणाव वाढवण्यासाठी नागपूरमध्ये गोहत्येचा कट रचण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यापैकी वाहिद खान या प्रमुख आरोपीविरोधात ‘रासुका’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिवनी जिल्ह्यातील पिंडरी गावाजवळ वैनगंगा नदीमध्ये १८ गायींचे गळे चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळले. तर त्याच जिल्ह्यात १९ आणि २० जूनला धुमा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काकरतला जंगल भागामध्ये २८ गायी आणि बैलांचे मृतदेह आढळले. त्यानंतर सिवनी जिल्ह्यातच आणखीही गायी-बैलांचे मृतदेह आढळून आले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत २४ जणांना अटक केली आहे. आरोपी व्यक्तींना पैशांच्या बदल्यात गायी आणि बैलांना मारण्याचे काम सोपवण्यात आले होते. तसेच या गुन्ह्यात स्थानिक व्यक्तीही सहभागी असल्याचे आढळून आले.’’

Biden and Trump to face off in first US presidential debate:
वादाच्या पहिल्या फेरीत बायडेन निस्तेज; अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षात उमेदवारीवरून चिंता
wrestler Suraj Nikam Suicide
‘कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकमने गळफास घेत आयुष्य संपवलं, कुस्ती विश्वावर शोककळा
ayodhya ram path develops potholes after first rain
अयोध्येतील विकासकामांवर प्रश्नचिन्ह
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
domestic gas News
Annapurna Yojana: महाराष्ट्रातील कोणत्या कुटुंबांना वर्षाला तीन घरगुती सिलिंडर मोफत मिळणार?
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”

हेही वाचा >>> हेमंत सोरेन यांच्या जामिनावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, “एनडीए सरकारकडे हीच मागणी आहे की…”

धार्मिक सलोखा बिघडवण्याच्या हेतूने हा प्रकार घडवण्यात आल्यामुळे त्यावर राज्याच्या पोलीस मुख्यालयातून देखरेख ठेवली जात असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली. पोलिसांना या अमानवी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना अटक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

चौकशीदरम्यान, पोलिसांनी सुरुवातीला ‘मध्य प्रदेश गोवध प्रतिबंधक कायदा, २००४’ आणि ‘प्राणी क्रौर्य प्रतिबंधक कायदा, १९६०’अंतर्गत गुन्हा दाखल केला. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी वाहिद खान आणि त्याच्या सहा सहकाऱ्यांना अटक केली. चौकशीदरम्यान असे समोर आले की, नागपूरमधील इसरार अहमद या व्यक्तीने मोठी रक्कम देण्याच्या बदल्यात वाहिद खानला गोवंशातील प्राण्यांची हत्या करण्यास सांगितले होते. इसरार आणि त्याचे सहकारी १७ जूनला सिवनीला पोहोचले आणि त्यांना सना-उर-रहमान, अब्दुल करीम आणि रफीक खान यांनाही पैसे देऊन हे काम करण्यासाठी तयार केले असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी इसरारलाही अटक केली आहे.

मागील आठवड्यात गायी, बैलांचे मृतदेह आढळल्यानंतर तस्करांनी त्यांना मारल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. जबलपूरचे पोलीस महानिरीक्षक अनिल सिंह कुशवाह यांनी सांगितले की, इसरारने वाहिद खानला ३० हजार रुपये दिले होते.