गेल्या चार वर्षांत भारतीय नौदलाच्या चार पाणबुडय़ा दुर्घटनाग्रस्त झाल्या आणि त्यामध्ये २२ जणांना आपले प्राण गमवावे लागले आणि अन्य चार जण बेपत्ता असल्याची माहिती मंगळवारी राज्यसभेत देण्यात आली.
या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या असून मानवी आणि तांत्रिक चुकांमुळे दुर्घटना घडल्याचा निर्वाळा समित्यांच्या अहवालात देण्यात आला आहे, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितले.
यापैकी प्रत्येकी तीन दुर्घटना २०११ आणि २०१२ मध्ये, २०१३ मध्ये सात आणि ६ नोव्हेंबर २०१४ पर्यंत ११ दुर्घटना घडल्या. गेल्या वर्षी आयएनएस ‘सिंधुरक्षक’वर झालेल्या दुर्घटनेत १८ जण ठार झाले होते.
संरक्षण दलाची विमाने कोसळण्याच्या घटनांबाबत पर्रिकर म्हणाले की, २०१२-१३ आणि २६ नोव्हेंबर २०१४ पर्यंत २४ विमाने कोसळली. यामध्ये संरक्षण दलाच्या ३२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले, असेही संरक्षणमंत्री म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा