गुजरातमधील बोटाद जिल्ह्यमध्ये विषारी दारू पिल्यामुळे २४ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये अहमदाबादमधील चार लोकांचा सामावेश आहे. तसेच विषारी दारू पिल्यामुळे ३० पेक्षा अधिक लोकांची तब्येत बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी काही रुग्णांची अवस्था गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा- धक्कादायक: १६ वर्षाच्या मुलीचं अपहरण नी तीन महिने सामूहिक बलात्कार; झारखंडमधली अमानुष घटना
सोमवारी पहाटे घटना उघडकीस
सोमवारी पहाटे बारवळा तालुक्यातील रोजीड गावात आणि आसपासच्या इतर गावांमध्ये राहणाऱ्या काही लोकांची प्रकृती अचानक बिघडली. परिणामी सगळ्यांना बारवळा आणि बोताड शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीदरम्यान या सगळ्यांनी विषारी दारु पिल्यामुळे या सगळ्यांची प्रकृती खालावल्याचे समोर आले.
हेही वाचा- Sonia Gandhi ED: आधी घेरलं अन् नंतर ताब्यात, राहुल गांधींवर पोलिसांची कारवाई, म्हणाले “मोदी राजे आहेत, पोलिसांचं राज्य”
गुजरातमध्ये दारु बंदी असतानाही दारुची विक्री
गुजरातमध्ये दारु बंदी असतानाही अवैद्य पद्धतीने दारू विकली जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी उपअधीक्षक अशोक यादव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. बनावट देशी दारूची निर्मिती करुन त्याची विक्री करणाऱ्या तीन जणांना बोटाड जिल्ह्यातून अटक कऱण्यात आली असल्याची माहिती गुजरातचे पोलीस महासंचालक आशिष भाटिया यांनी दिली.