राजस्थानमध्ये शुक्रवारी लग्नाचे वऱ्हाड जात असलेल्या बसवर वीजेची तार कोसळून २५ जणांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानच्या टोंक जिल्ह्यात ही घटना घडली.  ही बस रस्त्यातून जात असताना रस्त्यालगतच्या वीजेच्या खांबावरील वीजेची तार अचानकपणे तुटली आणि अचानकपणे या बसवर पडली. त्यामुळे संपूर्ण बसमध्ये विद्युत प्रवाह पसरला आणि यामध्ये २५ जणांना वीजेच्या झटक्याने स्वत:चा जीव गमवावा लागला. दरम्यान, जखमींचा नेमका आकडा अद्यापपर्यंत समजू शकलेला नाही. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, अधिक तपास सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा