वृत्तसंस्था, रफाह

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इस्त्रायल व हमासच्या संघर्षांत आतापर्यंत २५ हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा बळी गेला आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.सात ऑक्टोबरला हमासने इस्त्रायलवर हल्ला केला. यामध्ये १२०० जणांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी इस्त्रायलच्या अडीचशे नागरिकांना ओलीस ठेवले. त्यानंतर इस्त्रायने प्रत्तुत्तर देत हवाई हल्ले सुरू केले. पाठोपाठ उत्तर गाझात जमिनीवरून कारवाई केल्याने हा पूर्ण परिसर बेचिराख झाला. आता इस्त्रायलची कारवाई दक्षिणेकडील शहर खान युनुस आणि मध्य गाझातील निर्वासित छावण्यांवर केंद्रित आहे.

या संघर्षांत गेल्या चोवीस तासांत गाझातील रुग्णालयांत ३०० जखमींना दाखल करण्यात आले आहे. तर १७८ जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले. सात ऑक्टोबरपासून आतापर्यंत २५ हजार १०५ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला असून, ६२ हजार ६८१ जण जखमी झाल्याचे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.