तामिळनाडूत एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. येथे एका २७ वर्षीय तरुणानं एकतर्फी प्रेमातून २५ वर्षीय तरुणीची क्रूरपद्धतीनं हत्या केली आहे. या तरूणानं २५ वर्षीय तरुणीला पहिल्यांदा लोखंडाच्या साखळीनं बांधलं नंतर तिला जिवंत जाळण्यात आलं. ही घटना शनिवारी ( २३ डिसेंबर ) रात्री उघडकीस आली. यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चेन्नईतील थळंबूर परिसरात ही घटना घडली आहे. वेत्रीमारन असं आरोपी आणि नंदिनी असं मृत तरुणीचं नाव आहे. पोलिसांनी वेत्रीमारननला अटक केली आहे. दोघेही मुळचे मुदराई येथील रहिवासी होते. गेल्या काही महिन्यांपासून थोराईपक्कमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत दोघे काम कराय होते. तिथेच दोघांमध्ये मैत्री झाली होती.

हेही वाचा : प्रेमविवाहानंतर भांडण, चार महिन्याचं बाळ; पत्नीशी व्हिडिओ कॉलवर बोलताना पतीनं उचललं टोकाचं पाऊल

अलीकडेच वेत्रीमारननं लिंगपरिवर्तन केल्याची माहिती नंदिनीला दिली होती. त्यानंतर वेत्रीमारनने नंदिनीला प्रपोज ( प्रेमाची मागणी घातली ) केलं. मात्र, नंदिनीने त्यास साफ नकार दिला. हाच राग वेत्रीमारननच्या मनात सलत होता. अशातच नंदिनीचे दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर प्रेमसंबंध जुळले. हे कळल्यानंतर वेत्रीमारन आणखी भडकला. त्यानं नंदिनीच्या हत्येचा डाव आखला.

हेही वाचा : दहावीच्या विद्यार्थ्याला वर्गमित्रांकडून विवस्त्र करत मारहाण, दारू पिण्यासही भाग पाडलं

शनिवारी नंदिनीच्या वाढदिवस होता. हीच संधी साधून वेत्रीमारननं नंदिनीला निर्जनस्थळी नेलं. तिथे वेत्रीमारननं नंदिनीला साखळीनं बांधलं आणि ब्लेडनं तिच्यावर हल्ला केला. यानंतर नंदिनीला जिवंत जाळून टाकलं. ही खळबळजनक घटना समजल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा पोलिसांना नंदिनीच्या नाकावर, हातावर आणि पायावर जखमा आढळल्या. पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्रे फिरवत वेत्रीमारननला अटक केली. ‘फ्री प्रेस जर्नल’नं हे वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 25 year female burnt to death 27 year man arrested chennai tamilnadu ssa