छत्तीसगडमधील एका महिलेने एकाच वेळी पाच मुलींना जन्म दिला. अशा प्रकारची भारतातील ही पहिलीच घटना असल्याचे डॉक्टरांचे मानणे आहे. माध्यमातील वृत्तानुसार, सरगुजा जिल्ह्यातील अंबिकापूर येथील जिल्हा रुग्णालयात शनिवारी सकाळी सहाव्या महिन्यातच प्रसुत झालेल्या २५ वर्षीय मनिता कुमारीने पाच मुलींना जन्म दिला. मुदतीपूर्वीच जन्माला आलेल्या या मुलींचे वजन कमी असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. सर्व मुली एक ते दीड किलो वजनाच्या आहेत. मनिता आणि तिचा पती महेश आनंदित असून, आपल्या मुलींच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.

Story img Loader