जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असा गाजावाजा करत ‘रिंगिंग बेल’ या भारतीय कंपनीने गुरूवारी दाखल केलेला ‘फ्रीडम- २५१’ हा स्मार्टफोन पहिल्याच दिवशी वादाच्या भोवऱयात सापडला आहे. चार ते पाच हजार रुपयांच्या किंमतीचा स्मार्टफोन केवळ २५१ रुपयांत कसा काय विकला जाऊ शकतो? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
१ जीबीची रॅम, ८ जीबीची अंतर्गत मेमरी आणि क्वालकॉमचा १.३ गीगाहर्टझचा क्वाडकोर प्रोसेसर, अशा अत्याधुनिक फिचर्सचा स्मार्टफोन केवळ २५१ रुपयांत बनवणे शक्य नसून रिंगिंग बेल कंपनीने केलेली घोषणा केवळ स्टंटबाजी असल्याचा दावा उद्योग जगतातील काही कंपन्यांकडून केला जात आहे.
दरम्यान, ‘फ्रीडम-२५१’ साठी आजपासून सुरू झालेली ऑनलाईन बुकींग सुविधा दिवसभरासाठी बंद पडल्याने या फोनच्या विक्रीबद्दलच्या संशयात आणखी भर पडली आहे. फ्रीडम २५१ च्या खरेदीसाठी उदंड प्रतिसाद मिळाल्यामुळे संकेतस्थळ क्रॅश झाल्याचा संदेश ‘फ्रीडम २५१’ च्या संकेतस्थळावर झळकत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Feb 2016 रोजी प्रकाशित
२५१ रुपयांचा स्वस्त स्मार्टफोन संशयाच्या भोवऱयात, ‘फ्रीडम २५१’चे संकेतस्थळ क्रॅश
चार ते पाच हजार रुपयांच्या किंमतीचा स्मार्टफोन केवळ २५१ रुपयांत कसा काय विकला जाऊ शकतो?
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड
Updated:

First published on: 18-02-2016 at 13:55 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 251 rupees smartphone is stunt