ED On Canada Colleges : अमेरिका-कॅनडा सीमेवर सुमारे तीन वर्षांपूर्वी, १९ जानेवारी २०२२ रोजी एक गुजराती कुटुंब ज्यामध्ये जगदीश पटेल (वय ३९), पत्नी वैशाली (३५), मुलगी (११) आणि मुलगा (३) यांचा थंडीत गारठून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. बेकायदेशीरपणे अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न करताना मॅनिटोबा (Manitoba) येथे त्यांचा मृत्यू झाला होता. मानवी तस्करी करणार्यांनी या कुटुंबाला उणे ३७ अंश सेल्सिअस तापमानात हिमवादळत सोडून दिले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पटेल कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणात सहभागी एजंट्सविरोधातील मनी लॉन्ड्रींगच्या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान ईडीने मानवी तस्करीचे आंतरराष्ट्रीय सिंडीकेट उघड केले आहे. ज्यामध्ये कॅनडामधील किमान २६० महाविद्यालयांचा समावेश आहे. ही महाविद्यालयांनी कॅनडामार्गे अमेरिकेत जाणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांना विद्यार्थी व्हिसा (Student Visas) जारी केले. सध्या अशा महाविद्यालयांच्या व्यवहारांची तसेच त्यांनी स्थलांतरितांकडून किती पैसे घेतले यासंबंधी तपास सुरू आहे.
अमेरिकेत जाण्यासाठी ‘डाँकी’ (donkey route) पद्धतीने जाण्यापेक्षा विद्यार्थी व्हिसा काढणे सोयीस्कर वाटणाऱ्यांनी प्रत्येकी ५०-५० लाख देऊन तो मिळवल्याचे सांगितले जात आहे. अशा बेकायदेशीर स्थलांतरांकडून कॅनडामधील महाविद्यालयांनी नेमके किती पैसे घेतले याचादेखील शोध घेतला जात आहे. दरम्यान ईडीने दिलेल्या माहितीनुसार, ” तपासात असे समोर आले आहे की, भारतीयांना बेकायदेशीरपणे अमेरिकेत पाठवण्यासाठी, एजंटांनी कॅनडातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये त्यांच्या प्रवेशाची व्यवस्था केली आणि त्यांना विद्यार्थी व्हिसावर तेथे पाठवले. एकदा कॅनडामध्ये पोहचल्यावर ते महाविद्यालयात रूजू होण्याऐवजी त्यांनी बेकायदेशीरपणे यूएस-कॅनडा सीमा ओलांडली”.
ईडीची आठ ठिकाणी छापेमारी
ईडीने १० डिसेंबर आणि १९ डिसेंबर रोडी मुंबई, नागपूर, गांधीनगर आणि वडोदरा येथील आठ ठिकाणी कॅनडामधील महाविद्यालयांद्वारे बेकायदेशीर स्थलांतरितांना पाठवणाऱ्या एजंट्सच्या ठिकाणांवर छापे टाकले. या दरम्यान ईडीला धक्कादायक माहिती मिळाली आहे. ईडीने बुधवारी सांगले की, “या तपासादरम्यान असे दिसून आले की, मुंबई आणि नागपूर येथील फक्त दोन एजंट्सनी दरवर्षी जवळपास ३५,००० बेकायदेशीर स्थलांतरींना परदेशात पाठवले आहे”.
या रॅकेटमध्ये गुजरातमधील सुमारे १,७०० एजंट आणि भारतभरात सुमारे ३,५०० जण सहभागी असल्याचेही तपासात आढळून आले आहे. ईडीचा अंदाज आहे की ८०० हून अधिक एजंट त्यांच्यावर अनेक यंत्रणांनी कारवाई करूनही अजूनही सक्रिय आहेत.
हेही वाचा>> ‘पाकिस्तानच्या हल्ल्यात ४६ ठार’ ; नागरिकांना लक्ष्य केल्याचा अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचा दावा
मुंबई आणि नागपूर येथील किमान दोन एजंट असे सापडले आहेत, ज्यांनी कमिशनच्या आधारावर विद्यार्थी पाठवण्यासंबंधी परदेशातील अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालयांशी करार केलेले आहेत. पुढे बेकायदेशीर स्थलांतर करणाऱ्यांच्या स्टुडंट व्हिसासाठी या एजंट्सकडून आवश्यक कागदपत्रे तयार केली जात असत.
तपासादरम्यान, ईडीने कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. याबरोबरच आरोपींच्या बँक खात्यातील १९ लाख रुपयेही जप्त केले आहेत. २०२२ मध्ये जगदीश पटेल आणि त्यांच्या कुटुंबाच्या प्रवासाची व्यवस्था करणारा एजंट भावेश पटेल याच्याविरुद्ध अहमदाबाद पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्याचा तपास ईडीकडून केला जात आहे.