करोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. याचदरम्यान सरकारी माहितीच्या आधारे सीएनएन न्यूज १८ ने दिलेल्या आखडेवारीनुसार देशात लसीकरणामुळे आतापर्यंत ४८८ जणांचा मृत्यू झालाय. तर २६ हजार जणांना लस घेतल्यानंतर गंभीर स्वरुपाचे साईड इफेक्ट दिसून आले आहेत. वैज्ञानिक भाषेमध्ये अशा गंभीर स्वरुपाच्या साईड इफेक्ट्सला अॅडव्हर्स इव्हेंट फॉलोइंगी इम्यूनायझेशन म्हणजेच एईएफआय असं म्हटलं जातं. लसीकरण मोहीम हाती घेणाऱ्या प्रत्येक देशामध्ये अशाप्रकारची आकडेवारी गोळा केली जाते. भविष्यामध्ये लसीकरणाचा दुष्परिणाम कमी प्रमाणात व्हावा यासाठी ही आकडेवारी गोळा केली जाते. ही आकडेवारी १६ जानेवारी ते ७ जून दरम्यानची आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा