टूजी घोटाळयातील कथित सहभागाबद्दल पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि माजी दूरसंचारमंत्री दयानिधी मारन यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करणारी याचिका दिल्लीतील न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. विशेष सीबीआय न्यायमूर्ती ओ. पी. सैनी यांनी ही याचिका फेटाळली आणि माहितीचा अधिकार कार्यकर्ते असलेले याचिकाकर्ते विवेक गर्ग यांना २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी आणि न्यायालयाच्या वेळेचा अपव्यय करण्यासाठी सदर याचिका करण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. याचिकाकर्ते गर्ग यांच्याकडे कोणताही ठोस पुरावा नाही, त्यांनी केवळ सवंग लोकप्रियतेसाठी याचिका केली आहे, असे आपले मत असल्याचे स्पष्ट करून न्यायालयाने गर्ग यांना सात दिवसांच्या कालावधीत २० हजार रुपये जमा करण्याचे आदेश दिले.

Story img Loader