टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या चौकशीमध्ये हस्तक्षेप केल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सहारा समूहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय आणि अन्य दोघांविरुद्ध कारणे दाखवा नोटीस बजावली.
न्या. जी. एस. सिंघवी आणि के. एस. राधाकृष्णन यांच्या पीठाने ही नोटीस बजावली. सुब्रतो रॉय यांच्याविरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला दाखल करणे योग्य असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. टू जी घोटाळ्याच्या तपासाला विलंब करण्यासाठी जाणीवपूर्वक त्यामध्ये हस्तक्षेप करण्यात आला का, याची माहिती मिळवणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल रॉय आणि अन्य व्यक्तींविरुद्ध गुन्हेगारी स्वरुपाची कारवाई का करण्यात येऊ नये, असा प्रश्न न्यायालयाने कारणे दाखवा नोटिसीमध्ये विचारला आहे.

Story img Loader