भारताची राजधानी दिल्लीत माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. आरोपींनी शीतपेयातून अमली पदार्थ देऊन पीडितेवर लैंगिक अत्याचार केला आहे. बलात्कार केल्यानंतर आरोपींनी नशेत असणाऱ्या मुलीला तिच्या घराबाहेर सोडून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे. संबंधित घटना बुधवारी रात्री दिल्लीतील नरेला परिसरात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील नरेला परिसरात असणाऱ्या एका कारखान्यात ही घटना घडली आहे. घटनेच्या दिवशी तिन्ही आरोपींनी पीडित मुलीला शीतपेयातून अमली पदार्थ दिले होते. अमली पदार्थाचं सेवन केल्यानंतर पीडितेला गुंगी आली. यानंतर आरोपी तिला कारखान्याच्या दुसऱ्या मजल्यावर घेऊन गेले. याठिकाणी त्यांनी पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. बलात्कार केल्यानंतर आरोपींनी तिला तिच्या घराच्या बाहेर सोडून घटनास्थळावरून पळ काढला.

शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास फोनवरून पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. उपचार केल्यानंतर पीडितेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून तिची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह इतर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर संबंधित सर्व आरोपी कारखान्यात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारखान्यात लपलेल्या तिन्ही आरोपींना अटक केली आहे. नरेंद्र (४०), मोहीत (२२) आणि परविंदर अलियस कट्टा (३०) असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहे. पीडित मुलगी ही देखील संबंधित कारखान्यात काम करत होती, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास नेरला पोलीस करत आहेत.

Story img Loader