माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्य़ात रविवारी पहाटे नक्षलवाद्यांनी दूरदर्शनच्या केंद्रावर केलेल्या हल्ल्यात तीन पोलीस ठार तर एक जण जखमी झाला.    हल्ल्याची ही घटना पारपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मरेनगा खेडय़ात पहाटे घडली. नक्षलवाद्यांनी दूरदर्शन केद्राला लक्ष्य केले. पहाटे तीन वाजता झालेल्या या हल्ल्यात तीन पोलिस ठार तर एक जण जखमी झाला आहे.
   हा नक्की नक्षलवाद्यांचा हल्ला होता किंवा नाही याबाबत अजून शहानिशा चालू आहे. मृतांमध्ये हेडकॉन्स्टेबल सिलभानुश एक्का, कॉन्स्टेबल अ‍ॅलेक्झांडर लाकरा व वासुदेव साहू यांचा समावेश आहे. ते सर्व छत्तीसगड सशस्त्र दलाचे होते. जखमी कॉन्स्टेबल मजहर खान याला रायपूर येथे उपचारासाठी हलवले आहे. पोलिसांनी  हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे.  हल्लेखोरांची नाकाबंदी करण्यासाठीही पोलिसांनी हालचाली सुरू  केल्या आहेत.

Story img Loader