उत्तर प्रदेशमधील एटा जिल्ह्यातील नायगाव पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या फकीरपुरा या गावावर सध्या शोककळा पसरलेली आहे. या गावातील तीन शाळकरी मुलांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या तिन्ही शाळकरी मुलांची नावं सचिन, कौशल आणि गोविंद (वय-१२) अशी असल्याची माहिती समोर आली आहे. हे तिघेही सकाळी शाळेसाठी घराबाहेर पडले होते. मात्र शाळा सुटल्यानंतरही बराचवेळ मुलं घरी न परतल्याने कुटुंबीयांची काळजी वाढली. यानंतर त्यांचा शोध घेणं सुरू झालं. बराचवेळानंतर या तिन्ही मुलांचे मृतदेह मातीच्या ढिगाऱ्याखाली आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. हे पाहून तिन्ही मुलांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला आणि गावतही शोककळा पसरली.

घटनेची माहिती मिळताच प्रभारी निरीक्षक सुनील श्रीवास्तव, मया पोलीस घटनास्थळी पोहोचले. पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.