केंद्रीय राखीव पोलीस दला(सीआरपीएफ)च्या तीन महिला जवानांचा बुधवारी पहाटे रस्ते अपघातात मृत्यू झाला़  पश्चिम दिल्लीतील द्वारका भागात वेगाने येणाऱ्या एका ट्रकने बसला धडक दिल्यामुळे हा अपघात होऊन त्यात अन्य १८ जण जखमी झाले आहेत़
८८ बटालियनच्या महिला जवान झारोडा कलान शिबिराकडून द्वारका शिबिराकडे बसने जात असताना सकाळी सेक्टर -१४ येथे हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितल़े  साहाय्यक उपनिरीक्षक रामकला (४५), हेडकॉन्स्टेबल सीमा (३८) आणि सरोज (४०) अशी मृत जवानांची नावे आहेत़  या बरोबरच त्यांचे १८ सहकारी जखमी झाले आहेत़  

Story img Loader