इसिस (आयएसआयएस) या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी सीरियाला जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन किशोरवयीन मुलींना जर्मनीमध्ये अटक करण्यात आली. या तीनही मुली अमेरिकेच्या नागरिक असून, जर्मन पोलिसांनी त्यांना परत अमेरिकेत पाठविले आहे.
अमेरिकी प्रशासनाने बुधवारी यासंदर्भातील माहिती दिली. या तीन मुलींपैकी दोन सख्या बहिणी असून, त्या सोमाली वंशाच्या आहेत, तर तिसरी मुलगी मूळची सुदानची आहे. मंगळवारी त्या फ्रँकफ्रुट विमानतळावरून सीरियाला जाणार होत्या. मात्र त्यांचे पार्सपोर्ट तपासल्यानंतर विमानतळ पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांना इसिस या संघटनेत सामील व्हायचे आहे, असे समजले.
 १५ ते १७ वयोगटातील या मुलींना परत अमेरिकेत पाठवून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. अमेरिकी पोलीस त्यांची व कुटुंबीयांची अधिक चौकशी करणार आहेत. ‘‘या मुली जर्मनीमध्ये कशा गेल्या आणि त्यांची काय योजना होती, यासंदर्भात काहीही माहिती नाही,’’ असे त्यांच्या पालकांनी सांगितले.

Story img Loader