टोरांटो : कॅनडाच्या ओंटारियो प्रांतामध्ये झालेल्या रस्ते अपघातात एक  भारतीय दाम्पत्य आणि त्यांच्या तीन महिन्यांच्या नातवाचा मृत्यू झाला. एका मद्याच्या दुकानातील दरोडा टाकणारा संशयित चुकीच्या दिशेने वाहन चालवत आल्यामुळे किमान सहा वाहनांना अपघात होऊन त्यामध्ये चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती तेथील पोलिसांनी गुरुवारी प्रसृत केलेल्या निवेदनात दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> चंद्राच्या अंधाऱ्या बाजूतील नमुने तपासणी मोहीम; चीनच्या ‘चांग-ई-६’चे यशस्वी प्रक्षेपण

टोरांटोच्या पूर्वेला साधारण ५० किलोमीटर अंतरावर व्हिटबी येथे सोमवारी ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलिसांनी मृतांची ओळख जाहीर केली नाही. या घटनेतील मृत बालक, त्याचे वडील, आई, आजी आणि आजोबा एकाच वाहनातून प्रवास करत होते. त्यावेळी चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनामुळे सहा वाहनांचा आपापसात धडक होऊन हा अपघात झाला. त्यामध्ये आजी, आजोबा आणि बालक यांचा जागेवरच मृत्यू झाला तर बाळाच्या आईला गंभीर दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत दाम्पत्य भारतातून कॅनडामध्ये काही दिवसांपूर्वी आले होते. अपघाताला कारणीभूत झालेला दरोडयातील संशयितही जागेवरच ठार झाला. तर त्याच्या वाहनातील अन्य एकजण गंभीर जखमी झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने बोमनविले येथे एका मद्याच्या दुकानात दरोडा टाकल्यानंतर पोलीस त्याच्या वाहनाचा पाठलाग करत होते. सुमारे २० मिनिटांनंतर तो हायवे ४०१वर चुकीच्या दिशेने घुसला. त्याच्या भरधाव वाहनाने अन्य वाहनांना धडक दिल्यामुळे अपघात झाला. या अपघाताच्या तपासासाठी सात जणांचे पथक तयार करण्यात आले आहे अशी माहिती पोलिसांच्या निवेदनात देण्यात आली आहे.