जम्मू काश्मीरमध्ये भारताच्या हद्दीत ड्रोनच्या सहाय्याने बॉम्ब हल्ला करण्याचा पाकिस्तानचा डाव सुरक्षा रक्षकांनी उधळून लावला. मुलांच्या खाण्याच्या डब्यात आयईडी (IED) बॉम्ब ठेवण्यात आले होते. हे डबे ड्रोनच्या सहाय्याने भारताच्या हद्दीत पाठवण्यात आले होते.
सुरक्षा दलांनी गोळीबार करत कट उधळला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरमध्ये काल रात्रीच्या सुमारास बीएसएफ जवानांना ड्रोनची हालचाल दिसली. जवानांनी ड्रोनवर गोळीबार केला. तेव्हा ड्रोनला जोडण्यात आलेले पेलोड खाली पडले. आणि ड्रोन पाकिस्तानच्या हद्दीत घुसले. खाली पडलेल्या पेलोडची तपासणी करण्यात आल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली आहे.
हेही वाचा – RSS ची कार्यालये बॉम्बने उडवून देण्याची धमकी; एफआयआर दाखल
डब्यात ३ पॅक केलेले चुंबकीय बॉम्ब
पेलोडमध्ये मुलांच्या खाण्याच्या डब्यातून पॅक केलेले ३ चुंबकीय बॉम्ब होते. या तिन्ही बॉम्बना वेगवेगळा आयडी सेट करण्यात आला होता. बीएसएफ जवानांनी हे बॉम्ब निकामी करून संशियतांवर गुन्हा दाखल केला आहे. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्याची भीती सुरक्षा दलांनी व्यक्त केली आहे. मात्र, पाकिस्तानने पाठवलेले हे बॉम्ब नेमके कुठे फेकले जाणार होते याबाबत अजून माहिती मिळाली नाही.