काल रात्री श्रीनगर शहराच्या बाहेर पंथाचौक भागात एका चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यास सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले. जम्मू-काश्मिर पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.

पंथाचौक भागातील एका इमारतीमध्ये काही दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानुसार पोलिस आणि सुरक्षा दलांनी त्या परिसराला घेराव घालत टप्प्याटप्याने पुढे जायला सुरुवात केली. दरम्यान इमारतीमध्ये लपलेल्या दहशवाद्यांनी गोळीबार केला, यामध्ये जम्मू-काश्मीर पोलीस दलातील तीन जवान आणि केंद्रीय राखीव पाोलिस दलाचा एका जवान जखमी झाले.

त्यानंतर सुरक्षा दलांनी आक्रमक पावले उचलत कारवाईला सुरुवात केली. यामध्ये झालेल्या गोळीबारात इमातीमध्ये लपलेल्या तीन दहशवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. ठार झालेल्यांपैकी एका जणाचा १३ डिसेंबरला पोलिसांच्या बसवर झालेल्या हल्ल्यात सहभाग असल्याचं नंतर स्पष्ट झालं. १३ डिसेंबरला श्रीनगर जवळ झालेल्या हल्ल्यात तीन पोलीस शहीद तर ११ जण जखमी झाले होते.

Story img Loader