3-year-old girl stuck in borewell for 6 days in Rajasthan : राजस्थानमध्ये एका तीन वर्षींची मुलगी मागील सहा दिवसांपासून बोअरवेलमध्ये अडकून पडली आहे. प्रशासकीय यंत्रणा तिला वाचवण्यात अपयशी ठरल्या आहेत. यादरम्यान या चिमुरड्या मुलीच्या आईने ‘जर ती कलेक्टर मॅडमची मुलगी असती तर काय झालं असतं? असा सवाल प्रशासनापुढे उपस्थित केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“सहा दिवस होऊन गेले… माझी मुलगी अन्न पाण्याविना आहे. जर ती कलेक्टर मॅडमची मुलगी असती तर? त्यांनी तिला इतके दिवस तिथं राहू दिलं असतं का? कृपया माझ्या मुलीला लवकरात लवकर बाहेर काढा”, अशी आर्त विनवणी बोअरवेलमध्ये अडकलेल्या मुलीची आई ढोलीदेवी यांनी केली आहे. या दरम्यान सहा दिवस होऊन गेल्याने ती लहान मुलगी वाचण्याची आशा प्रत्येक मिनिटाला कमी होत आहे.

यादरम्यान येथील जिल्हाधिकारी कल्पना अग्रवाल यांनी सांगितले की, पावसामुळे बचाव कार्यात व्यत्यय आल्यानंतर आता एका एल-आकाराच्या बोगद्यातून चेतना पर्यंत पोहचण्याचे केले जात आहेत. बचाव पथकाच्या कामावर प्रगतीवर लक्ष ठेवले जात आहे आणि बचावकर्त्यांनी मागितलेली सर्व आवश्यक उपकरणे त्यांना पाठवली जात आहेत.

कलेक्टर काय म्हणाल्या?

कलेक्टर अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, “बोअरवेलच्या समांतर एक खड्डा खणून एल आकाराच्या बोगद्यातून चेतनापर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. खड्ड्यात उतरलेल्या दोन एनडीआरएफ जवानांकडून मॅन्युअल ड्रिलिंग केले जात आहे. आम्ही त्यांना कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहात आहोत. खालून मागणी केलेली सर्व उपकरणे त्यांना पाठवली जात आहेत.”

बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलीला बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रकारच्या साधणांचा वापर केला जात आहे. परंतु अद्यापपर्यंत त्याचा काहीही उपयोग झाला नाहीबचावकर्त्यांनी सुरुवातीला दोरीला जोडलेल्या लोखंडी रिंगचा वापर करून मुलीला बोअरवेलमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण हे प्रयत्न अयशस्वी ठरले. दोन दिवसांचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर बुधवारी समांतर खड्डा खोदण्यासाठी पायलिंग मशीन आणण्यात आले. यादरम्यान पावसामुळे शुक्रवारी बचावकार्य थोड्या वेळासाठी थांबवण्यात आले होते, परंतु शनिवारपर्यंत एनडीआरएफच्या दोन जवानांचे पथकाने बोगदा खणण्यास सुरूवात केली आहे.

हेही वाचा>> “…तोपर्यंत धनंजय मुंडेंचं मंत्रिपद काढून घ्या”, राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची फडणवीस अन् अजित पवारांकडे मोठी मागणी

दौसा जिल्ह्यात पाच वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची घटना समोर आल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यात पुन्हा तशीच घटना घडली आहे. या मुलाला बाहेर काढण्यासाठी ५५ तासांहून अधिक काळ बचाव कार्य सुरू होते. या मुलाला वाचवण्यात यंत्रणांना यश आले नव्हते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 year old stuck in borewell for 6 days in rajasthan mother ask what if she was collectors daughter watch video rak