राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य विभागाने एक धक्कादायक बाब समोर आणली आहे. त्यांनी केलेल्या सर्वेक्षण अहवाल-५ (NFHS) नुसार, भारतात महिलांवर होणाऱ्या शाररिक हिंसाचारात ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी हा अहवाल जाहीर केला. निराशाजनक बाब म्हणजे केवळ १४ टक्के महिलांनीच या हिंसाचाराविरोधात आवाज उठवला आहे.
हेही वाचा- पेट्रोल भरून पैसे न देताच पळून जाताहेत वाहनचालक; पंपावरील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
हिंसाचारात कर्नाटक राज्य आघाडीवर
महिलांवर हिंसाचार होणऱ्या घटनांमध्ये कर्नाटक राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. कर्नाटकात महिलांवर सर्वाधिक म्हणजेच ४८ टक्के घरगुती हिंसाचार झाले आहे. त्यापाठोपाठ बिहार, तेलंगणा, मणिपूर आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो. लक्षद्वीपमध्ये महिलांवरील घरगुती हिंसाचार होण्याचे प्रमाण सर्वात कमी आहे. (२.१ टक्के). महिलांच्या तुलनेत देशातील केवळ ४ टक्के पुरुषांना घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागतो. सर्वेक्षणात असे दिसून आले आहे, की ३० टक्के विवाहित महिला वयाच्या १८ ते ४९ वर्षात लैंगिक किंवा भावनिक हिंसाचाराच्या बळी पडल्या आहेत.
ग्रामीण भागात हिंसाचाराचे प्रमाण अधिक
शहरी भागातील महिलांपेक्षा ग्रामीण भागतील महिलांवर हिंसाचार होण्याचे प्रमाण अधिक आहे. शहरी भागात याचे प्रमाण २४ ट्क्के आहे. मात्र, ग्रामीण भागात महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराचे प्रमाण ३२ टक्के आहे. सर्वैक्षणानुसार शालेय शिक्षण पूर्ण न करणाऱ्या महिला अधिक प्रमाणात हिंसाचाराला बळी पडल्या आहेत.