येथील शिया मुस्लीम धार्मिक केंद्राच्या बाहेर झालेल्या दोन आत्मघाती स्फोटांमध्ये ३१ जण ठार झाले. मृतांमध्ये बहुतेक इमाम अल-सदिक विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. ही खासगी शैक्षणिक संस्था या केंद्राशेजारी आहे. त्यामुळे दुपारी धार्मिक केंद्रात आलेले विद्यार्थी स्फोटाचे लक्ष्य ठरले.
या स्फोटानंतर कारमध्ये ठेवलेला बॉम्ब निकामी करण्यासाठी या परिसरातील मार्ग वाहनांसाठी बंद केला. या स्फोटांमध्ये १२ विद्यार्थी जखमी झाले.
इराकमध्ये सध्या अशांततेचे वातावरण आहे. २००८ नंतर हा सर्वात मोठा हल्ला आहे. या घटनेची जबाबदारी कुठल्याही गटाने घेतलेली नाही. मात्र अलकायदाशी निगडित असलेला सुन्नी दहशतवाद्यांचा गट असे वारंवार हल्ले करतो.
या घटनेत दगावलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांचा काय दोष, असा उद्विग्न सवाल मुस्ताफा कमाल या विद्यार्थ्यांने केला आहे.

Story img Loader