लॉस एंजेलिस येथील ३१ वर्षीय मॉडेलची तिच्या राहत्या घरात १२ सप्टेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याबाबतचा शवविच्छेदन अहवाल आता समोर आला असून यामध्ये धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. मृतावस्थेत आढळलेली ३१ वर्षीय मॉडेल दोन महिन्यांची गर्भवती होती. तसेच मृत्यूपूर्वी तिची आरोपीशी शारीरिक झटापट झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘न्यूयॉर्क पोस्ट’च्या वृत्तानुसार, मलीसा मूनी असं मृत पावलेल्या ३१ वर्षीय मॉडेलचं नाव आहे. शवविच्छेदन अहवालात तिच्या चेहऱ्यावर, डोक्यावर, पाठीवर आणि डाव्या हाताच्या वरच्या भागावर गंभीर जखमा आढळल्या आहेत. त्याचबरोबर तिच्या शरीरात बेंझॉयलेकगोनिन सारखी औषधे आणि कोकेथिलीन आणि इथेनॉलचे मिश्रणही आढळून आले आहे. मृत्यूआधी दारु आणि ड्रग्जच्या नशेत असणाऱ्या मॉडेलला आरोपीनं बेदम मारहाण केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा- मुंबईत बड्या उद्योगपतीकडून अभिनेत्रीवर अनेकदा बलात्कार, गुन्हा दाखल

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, त्यांना मूनीच्या ‘आयक्लाऊड’वर एक अलर्ट मेसेज देखील सापडला आहे. ज्याने सूचित होतं की, इतर कोणीतरी तिचे डिव्हाइस वापरत आहे, तसेच तिचा आयफोन आणि मॅकबूक बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका स्थानिक वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना मलीसाची बहीण आणि मॉडेल जॉर्डिन पॉऊलीन म्हणाली, “माझ्या बहिणीला काय त्रास झाला असेल, याची मी कल्पना करू शकत नाही. मला याबद्दल विचार करणं देखील वेदनादायक आहे.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 31 year old model maleesa mooney found dead body was found in fridge with her hands and feet tied los angeles rmm