नवी दिल्ली : पश्चिम अफगाणिस्तानला शनिवारी भूकंपाचा तीव्र धक्का बसून किमान ३२० जणांचा मृत्यू झाला असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. हेरत शहराला संध्याकाळी भूकंपाचे पाच मोठे धक्के बसल्याचे तेथील रहिवाशांना सांगितले, असे वृत्त असोसिएटेड प्रेसने दिले आहे.
या भूकंपाचा केंद्रिबदू हेरत शहराच्या वायव्येला ४० किलोमीटरवर होता. अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाच्या नोंदीनुसार रिश्टर स्केलवर पश्चिम अफगाणिस्तान ६.३ तीव्रतेचे दोन धक्के बसले. भूकंपानंतर ५.५ तीव्रतेचा धक्का तेथे जाणवला. भूकंपामुळे लोक घराबाहेर पडले. कार्यालये आणि दुकाने रिकामी करण्यात आली असून आणखी हादरे बसण्याचे भय लोकांना वाटत आहे, असे स्थानिकांनी सांगितले.